Pranali Kodre
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 10 सप्टेंबर आशिया चषक 2023 स्पर्धेतील सुपर फोरचा सामना खेळवला गेला.
श्रीलंकेच्या कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने सलामीवीर म्हणून मोठा विक्रमही नोंदवला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित सलामीला खेळायला उतरला.
त्यामुळे रोहितचा हा भारतासाठी सलामीवीर म्हणून 300 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे.
रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलामीवीर म्हणून 300 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यानंतरचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
सचिनने भारताकडून सलामीवीर म्हणून सर्वाधिक 346 सामने खेळले आहेत.
सेहवागने भारताकडून सलामीवीर म्हणून 321 सामने खेळले आहेत.
दरम्यान 10 सप्टेंबर रोजी रोहितने सलामीला खेळताना 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली.