Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 11 ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट संघाने दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली.
रोहितचे हे वनडे वर्ल्डकपमधील सातवे शतक आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये 7 शतक करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
रोहितने वर्ल्डकपमधील 7 शतकांमधील 5 शतके 2019 वर्ल्डकप स्पर्धेत केली होती. त्याने पहिले शतक 2015 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध केले होते. त्यावेळी त्याने 137 धावांची खेळी केली होती.
त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2019 वर्ल्डकपमध्ये 122 धावांनी नाबाद शतकी खेळी केली होती.
त्याने 2019 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 140 धावांची खेळी केली होती.
रोहितने 2019 वर्ल्डकपमध्ये यजमान इंग्लंडविरुद्धही शतक झळकावले होते. त्यावेळी त्याने 102 धावांची खेळी केलेली.
तसेच 2019 वर्ल्डकपमध्येही बांगलादेशविरुद्ध रोहितने शतक झळकावताना 104 धावांची खेळी केलेली.
श्रीलंकेविरुद्ध रोहितने 2019 वर्ल्डकपमध्ये 103 धावांची शतकी खेळी केली होती.