Pranali Kodre
भारतीय संघाने ११ फेब्रुवारी २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूरला झालेला कसोटी सामना एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचा हा तिसराच सामना होता.
महत्त्वाचे म्हणजे रोहितने या सामन्यात १२० धावांची शतकी खेळी देखील केली.
या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्याने रोहित कर्णधार म्हणून पहिले तिन्ही कसोटी सामने जिंकणारा तिसराच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहाली आणि बंगळुरूला झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता.
भारतीय कर्णधार म्हणून पहिले तीन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम रोहित पूर्वी एमएस धोनी आणि अजिंक्य रहाणे यांनी केला आहे.
एमएस धोनीने डिसेंबर २००९ मध्ये भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची धूरा हाती घेतली. त्याने ६० सामन्यात कर्णधारपद सांभाळताना २७ सामने जिंकले. यातील तीन विजय पहिल्या तीन सामन्यातच आले होते.
अजिंक्य रहाणेने भारताचा नियमित कर्णधार बनला नाही, पण त्याने नियमित कर्णधारांच्या अनुपस्थितीत ६ सामन्यांत नेतृत्व करताना ४ सामने जिंकले आहेत. यातील तिन विजय पहिल्या तीन सामन्यातच आले होते. तसेच दोन सामने अनिर्णित राहिले.