Pranali Kodre
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 29 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड संघात लखनऊला सामना झाला.
हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास सामना होता.
रोहितचा हा भारतीय संघाचा कर्णधार म्हणून 100 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
त्यामुळे रोहित भारताचे 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणारा सातवा कर्णधार ठरला आहे.
भारताकडून सर्वाधिक 332 आंतरराष्ट्रीय सामन्यात एमएस धोनीने नेतृत्व केले आहे.
भारताचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत धोनी पाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन (221 सामने), विराट कोहली (213), सौरव गांगुली (195), कपिल देव (108) राहुल द्रविड (104) आणि रोहित शर्मा (100) यांचा क्रमांक लागतो.
रोहितने नेतृत्व केलेल्या 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9 कसोटी, 40 वनडे आणि 51 टी20 सामन्यांचा समावेश आहे.
रोहितने 100 व्या सामन्यापूर्वी नेतृत्व केलेल्या 99 सामन्यांपैकी 73 सामने जिंकले आहेत, 23 सामने पराभूत झाले आहेत. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.