प्रेम हे...! Roger Federer ला प्रत्येक स्पर्धेत असतो पत्नी मिर्काचा पाठींबा

Priyanka Deshmukh

टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली. फेडररने आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.

Roger Federer Wife Mirka | FB/ Roger Federer

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली.

Roger Federer Wife Mirka | FB/ Roger Federer

फेडररचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. फेडरर आणि मिर्का यांची भेट 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकदरम्यान झाली होती.

Roger Federer Wife Mirka | FB/ Roger Federer

मिर्काने फेडररला खेळण्यासाठी नेहमीच प्रेरणा दिली. प्रदीर्घ रिलेशनशिपनंतर दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. त्याच वर्षी मिरकाने जुळ्या मुलींना जन्म दिला.

Roger Federer Wife Mirka | FB/ Roger Federer

फेडररने 2018 मध्ये संडे टाइम्सशी बोलताना सांगितले की, तो प्रत्येक स्पर्धेत पत्नी आणि चार मुलांना सोबत घेऊन जातो.

Roger Federer Wife Mirka | FB/ Roger Federer

फेडररने 28 जानेवारी 2018 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले.

Roger Federer | FB/ Roger Federer

फेडररने ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य पदकही जिंकले आहे.

Roger Federer | FB/ Roger Federer

फेडररने आपल्या कारकिर्दीत 8 विम्बल्डन, 6 ऑस्ट्रेलियन ओपन, 5 यूएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन जेतेपद पटकावले आहे.

Roger Federer | FB/ Roger Federer
Dainik Gomantak | Dainik Gomantak