नदालच्या फॅननं असं काही केलं की फेडररही झाला शॉक

Pranali Kodre

दिग्गज

8 ऑगस्ट 1981 रोजी जन्मलेला रॉजर फेडरर दिग्गज टेनिसपटूंपैकी एक आहे. त्याने गेल्यावर्षी 24 वर्षांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली.

Roger Federer | Twitter

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह

फेडरर सोशल मीडियावरही चांगला सक्रिय असतो, नुकताच त्याने ट्विटरवर चाहत्यांसह प्रश्न-उत्तराचे सत्र घेतले होते.

Roger Federer | Twitter

चाहत्याचा प्रश्न

यावेळी एका युजरने फेडररला असा एक किस्सा सांगण्यास सांगितले, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने त्याला ओळखले नव्हते.

Roger Federer | Twitter

फेडररचे उत्तर

या युजरच्या प्रश्नाचे उत्तर देताना फेडररने एक मजेदार किस्सा सांगितला आहे.

Roger Federer | Twitter

मजेदार किस्सा

फेडररने सांगितले की एकदा फॉर्म्युला वन स्पर्धेवेळी एक व्यक्ती त्याच्याकडे येऊन त्याला म्हणालेला 'मिस्टर नदाल मला एक फोटो मिळेल का?' त्यावेळी फेडररने त्याला तो नदाल नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो व्यक्ती फेडररची माफी मागून फोटो न घेताच निघून गेला होता.

Roger Federer Reply | Dainik Gomantak

फेडरर - नदालने गाजवले टेनिस

फेडरर आणि नदाल यांनी जवळपास गेली दोन दशके टेनिसविश्व गाजवले आहे. तसेच त्यांनी अनेक सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.

Roger Federer Rafael Nadal | Twitter

फेडरर - नदालची मैत्री

कोर्टमध्ये एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले, तरी कोर्टबाहेर फेडरर आणि नदाल यांच्यात चांगली मैत्रीही आहे.

Roger Federer Rafael Nadal | Twitter

फेडररची विजेतीपदं

फेडररने त्याच्या कारकिर्दीत एकेरीची 20 ग्रँडस्लम विजेतीपदे जिंकली आहेत.

Roger Federer | Twitter
Akash Madhwal | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी