Kavya Powar
राज्यात भाज्यांचे वाढलेले दर अद्यापही कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत
सध्या पणजी बाजारात लसणाची किंमत 400 रुपये प्रतिकिलो आहे.
तर इतर भाज्या अजूनही शंभरीवर आहेत. यामध्ये वालपापडी, चिटकी भेंडी, मटार यांचा समावेश आहे
उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने हे दर वाढले असल्याचे बोलले जात आहे
यामुळे सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे
पणजी बाजारपेठेच्या तुलनेत फलोत्पादन विभागाच्या गाळ्यांवरील भाज्यांच्या किमतीत काही अंशी घट आहे.
मात्र अनेकदा गाळ्यांवरील भाज्यांच्या ताजेपणाबाबत नागरिकांनी तक्रार व्यक्त केली आहे