Akshata Chhatre
आजच्या युगात तरुण जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वेगाने वाढत असून, लग्न पूर्वीप्रमाणे आयुष्यभराचा सोबती राहिलेला नाही.
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या ७ वर्षांच्या सहजीवनानंतर आलेल्या घटस्फोटाच्या बातमीने पुन्हा हे वास्तव समोर आणलं आहे
यामागे काही प्रमुख कारणे दिसतात जसे की तरुणांमध्ये पूर्वीइतकी सहनशीलता नसणे आणि छोट्या गोष्टींवरूनच नातं तोडून टाकणं
वैयक्तिक स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आणि त्या स्वातंत्र्यात अडथळा येताच वेगळं होण्याचा निर्णय घेणं, वाढती स्पर्धा.
करिअरचा ताण आणि आर्थिक अस्थिरतेमुळे नात्यात ताण येणं, सोशल मीडियावर दिसणाऱ्या आदर्श नात्यांची सतत तुलना करून असमाधान निर्माण होणं
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पती-पत्नीमधला संवाद कमी होऊन गैरसमज वाढणे व भावनिक अंतर वाढणे.
या सगळ्या कारणांमुळेच आजच्या काळात नाती तुटतात आणि घटस्फोटाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसते.