Kantara स्टार ऋषभ शेट्टीचा प्रेरणादायी प्रवास

गोमन्तक डिजिटल टीम

सध्या ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' ( Kantara ) हा सिनेमा खूप चर्चेत आहे. 'कंतारा' ( Kantara ) हा मूळचा कन्नड चित्रपट असून, हिंदीत देखील तो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

कांताराचे यश

'कंतारा'चा दिग्दर्शक आणि चित्रपटातील मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टीचा जीवनप्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

प्रेरणादायी जीवनप्रवास

'सायनाइड' हा 2006 साली प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट त्याचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर त्याने 'मर्डर', 'गंडा हेंडथी' या बॉलिवूड चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्येही काम केले.

सायनाइड पासून सुरूवात

स्ट्रगलच्या दिवसांत मुंबईत त्याला ऑफिस बॉयपासून निर्मात्याच्या ड्रायव्हरचे काम करावे लागले. ऋषभला एडिटिंगची आवड होती. त्यामुळेत्याला एडिटिंग टीममध्ये सहभागी करून घेतलं.

ऑफिस बॉय ते ड्रायव्हर

2018 मध्ये आलेल्या त्याच्या 'रमन्ना राय' या चित्रपटाला 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सर्वोत्कृष्ट बाल चित्रप

याशिवाय, त्याच्या चार्ली 777 या चित्रपटाचेही खूप कौतुक झाले होते. सध्या त्याचा कांतारा हा सिनेमा चांगलाच गाजत आहे.

चार्ली 777 यश

कांतारा चित्रपटाला IMDb ने 9.5 रेटिंग दिले आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत निर्मितीच्या सहा पट अधिक कमाई केली आहे.

9.5 रेटिंग
Dainik Gomantak
क्लिक करा