Pranali Kodre
भारतीय संघाचा आयर्लंड दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात भारताने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान टी20 मालिका खेळली, ज्यात 2-0 असा विजय मिळवला.
या टी20 मालिकेत रिंकू सिंगने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पदार्पणानंतर त्याने आई-वडिलांना खास भेट दिली आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर त्याने घरी परतल्यानंतर आई-वडिलांना भारतीय संघाची जर्सी दिली आहे.
रिंकूने त्याची भारतीय संघाची जर्सी त्याच्या आई-वडिलांनी घातल्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे मन जिंकले आहे.
त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की 'ज्यांच्यामुळे हे सर्व सुरू झाले, जिथून हे सर्व सुरू झाले.'
दरम्यान रिंकूला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावा केल्या.
त्याला या खेळीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. आता रिंकू एशियन गेम्समध्येही खेळताना दिसणार आहे.