Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेतील अंतिम सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर सुरू होत आहे.
कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी कसून तयारी केली आहे.
या अंतिम सामन्याबद्दल अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून आयसीसीशी बोलताना रिकी पाँटिंग, रवी शास्त्री, वसिम आक्रम, ईयान बेल आणि रॉस टेलर यांनी कोण विजेता होईल यांचे आंदाज सांगितले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलिया विजेता होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले की पहिल्या दिवशी जो संघ लय मिळवेल, तो वर्चस्व गाजवेल.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम आक्रम यांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पारडे जड असेल, असे म्हटले आहे.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेलने म्हटले आहे की जो चांगली फलंदाजी करेल, तो त्या संघाचे पारडे जड असेल.
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल देताना त्यांचे पारडे थोडे जड असल्याचे म्हटले आहे.