Sameer Amunekar
कोरियन तरुणींच्या नितळ, डागविरहित आणि 'ग्लास स्किन'सारख्या चमकदार त्वचेचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे तांदळाचे पाणी! आता तुम्हीही घरबसल्या हा फुकटचा उपाय करू शकता.
तांदळाच्या पाण्यात अमिनो ॲसिड, जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे तुमच्या त्वचेला आतून नैसर्गिक पोषण देतात.
अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते एका ग्लास पाण्यात २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा (किंवा उकळून घ्या). हे पांढरट पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये साठवा.
तांदळाचे पाणी एक अप्रतिम नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. कापसाच्या मदतीने किंवा स्प्रे करून हे चेहऱ्यावर लावल्यास ओपन पोअर्स (छिद्र) बंद होण्यास आणि त्वचा घट्ट होण्यास मदत होते.
यातील अँटी-एजिंग गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि वांगाचे/काळे डाग कमी करतात, ज्यामुळे त्वचा अधिक तरुण आणि तजेलदार दिसते.
तांदळाचे पाणी त्वचेला थंडावा देते. उन्हामुळे रापलेली त्वचा (सनबर्न), लालसरपणा आणि मुरुमांच्या (Pimples) समस्येवर हा एक अत्यंत प्रभावी आणि सौम्य उपाय आहे.
दिवसातून दोनदा या पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी किंवा टोनर म्हणून करा. अवघ्या काही दिवसांतच तुमचा चेहरा 'कोरियन स्किन'सारखा नैसर्गिकरित्या उजळलेला दिसेल!