Akshata Chhatre
“रोज दहा हजार पावलं चालणं” हे आरोग्यासाठी चांगलं असलं तरी केवळ पावलं मोजून चालणं पुरेसं नाही, हे आता अनेकांना लक्षात येऊ लागलं आहे.
चालण्यातही शास्त्र आहे आणि याच शास्त्रावर आधारित आहे जपानी संशोधकांनी विकसित केलेली ‘इंटरव्हल वॉकिंग’ ही प्रभावी पद्धत.
यामध्ये एका लयीत चालण्याऐवजी, ३ मिनिटं वेगाने आणि ३ मिनिटं सावकाश चालण्याचा क्रम ठरवलेला असतो.
अशा पद्धतीने ३० ते ४० मिनिटं चालल्यास केवळ वजन कमी होत नाही, तर शरीराला अधिक ऊर्जा मिळते, हृदय आरोग्य सुधारतं आणि थकवा दूर होतो.
या चालण्यामुळे शरीरातील चरबीचा जास्तीत जास्त वापर होतो आणि ब्लड प्रेशर, मधुमेह यावर नैसर्गिक नियंत्रण मिळतं.
इंटरव्हल वॉकिंग ही पद्धत तुम्हाला औषधांवरची अवलंबनता कमी करण्यासही मदत करू शकते.