दैनिक गोमन्तक
आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल की, लोक आपल्या बोलण्याला प्रतिसादापेक्षा प्रतिक्रिया जास्त देतात.
इतरांबरोबर वागताना आपण लोक काय म्हणतात त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
इतरांचे म्हणणे शांतपणे ऐकणे, त्यांच्या कृतींना समजून घेणे, एखाद्या कृतीपाठीमागची भावना समजून घेणे हे त्याला आपण प्रतिसाद देणे असे म्हणू शकतो.
याउलट एखादा काहीतरी आपल्याला सांगत असेल त्यावर किंवा एखाद्याची कृतीवर पटकन आपले म्हणणे मांडतो किंवा कृती करतो त्याला प्रतिक्रिया देणे म्हणतात
कधीकधी आपण अहंकारामुळे असे वागत असतो, प्रतिक्रिया देत असतो.
पण प्रत्यक्षात मात्र लोकांना समजून घेऊन त्यांच्या वागण्याला प्रतिसाद देणे महत्वाचे असते
फक्त प्रतिक्रिया देत राहिल्याने तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात मात्र तुम्ही योग्य वेळी प्रतिक्रिया आणि योग्य वेळी प्रतिसाद दिला तर तुमची नाती घट्ट होऊ शकतात.