Akshata Chhatre
लहान वयातच पिवळे दात, कमजोर हिरड्या, तोंडाची दुर्गंधी आणि पायरिया यांसारख्या समस्या वाढताना दिसतात.
अनेक जण यावर रासायनिक टूथपेस्ट आणि माउथ फ्रेशनर वापरतात, पण त्यांचे दीर्घकाळ चालणारे दुष्परिणाम असतात.
अशा वेळी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात.
हे आयुर्वेदातील एक जुने आणि विश्वसनीय औषध आहे. यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे दातांवरील प्लाक आणि टार्टर दूर करण्यास मदत करतात.
भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारी हळद दातांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. हळदीतील करक्यूमिन हा घटक बॅक्टेरियाची वाढ रोखतो आणि दाह कमी करतो.
हे केवळ स्वयंपाकातच नव्हे, तर दात व हिरड्यांच्या देखभालीसाठीही उपयुक्त आहे. यात असलेले अँटीमायक्रोबियल गुणधर्म दातांना जंतूंपासून वाचवतात.
या तिन्ही घटकांचा वापर करून तुम्ही घरीच एक प्रभावी आयुर्वेदिक पेस्ट बनवू शकता. ही पेस्ट ब्रशवर लावून किंवा थेट बोटाने दातांवर घासल्यास दात स्वच्छ होतात आणि हिरड्यांना बळकटी मिळते.