Akshata Chhatre
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि प्रदूषणाच्या वाढत्या स्तरामुळे केसांच्या समस्या, विशेषतः डँड्रफ, सामान्य झाली आहे.
डोक्यावरील पांढऱ्या पापडीमुळे खाज आणि केस गळण्याची समस्या वाढते. बाजारातील अँटी-डँड्रफ शॅम्पूमधील केमिकल्स दीर्घकाळात केसांचे नुकसान करू शकतात.
तुम्ही घरीच उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांपासून प्रभावी उपाय करू शकता! डँड्रफ हा मुख्यतः स्कॅल्पचे रूक्ष होणे, बुरशीची वाढ किंवा अयोग्य सफाईमुळे होतो.
दह्यातील लैक्टिक ॲसिड मॉइश्चरायझेशन देते, तर लिंबू फंगसची वाढ थांबवते. हे मिश्रण ३० मिनिटे लावून धुवा.
कडूलिंब
कडूलिंब अँटी-फंगल असल्याने डँड्रफ मारते, तर आवळा केसांच्या मुळांना पोषण देतो.
कोरफडीतील एन्झाईम्स डेड स्किन काढतात आणि नारळ तेल स्कॅल्पला आर्द्रता देते.
हा नैसर्गिक क्लीन्झर स्कॅल्पची खोलवर सफाई करतो आणि केसांची नैसर्गिक चमक वाढवतो. हे उपाय वापरल्यास तुमचा स्कॅल्प आतून निरोगी राहील आणि केस चमकदार होतील.