दैनिक गोमन्तक
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते.
परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे.
एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.
मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत.
सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.
केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा.
मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.
दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.