Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेक जोडपी कामाच्या ताणामुळे आणि मोबाईलच्या व्यसनामुळे स्वतःला सोल्मेटऐवजी रुममेट समजू लागले आहेत.
प्रेम संपले म्हणून असे होत नसून, वेळेच्या अभावामुळे आणि एकमेकांपासून लांब राहिल्यामुळे हे घडते.
आठवड्यातून किमान एक दिवस फक्त तुमच्या दोघांसाठी बाजूला ठेवा. त्या दिवशी फोन किंवा टीव्हीचा वापर पूर्णपणे टाळा. एकत्र फिरायला जा, शांतपणे बागेत बसा किंवा एकत्र बसून काहीतरी वाचा.
दररोज किमान १५-२० मिनिटे तुमच्या नात्यातील सर्वात खास क्षणांबद्दल बोला. तुमची पहिली भेट, एकत्र केलेला अविस्मरणीय प्रवास किंवा इतर कोणतीही गोड आठवण.
तुमच्या जोडीदाराने केलेल्या अशा एखाद्या कामाबद्दल एक ओळ लिहा ज्यामुळे तुम्हाला आनंद झाला किंवा खास वाटले. आठवड्याच्या शेवटी या नोट्स एकमेकांसमोर वाचा.
महिन्यातून एकदा तरी तुमच्या दोघांच्या भूमिका बदला. जर एक जोडीदार नेहमी स्वयंपाक करत असेल किंवा घर साफ करत असेल, तर दुसऱ्यालाही त्यात सामील करा.
हा दृष्टिकोन दिनचर्येतील कंटाळा दूर करतो आणि एकमेकांना समजून घेण्याची आणि त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्याची क्षमता वाढवतो.