Akshata Chhatre
नात्यांमध्ये वाद होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. कुटुंब असो, मित्रमैत्रिणी असो किंवा प्रियकर-प्रेयसी असो, कधीतरी गैरसमज किंवा मतभेद होतातच.
पण, खरी समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा भांडणानंतर 'सॉरी' आधी कोण म्हणणार यावर दोघेही अडून बसतात.
अहंकारामुळे अनेकदा हे वाद मिटत नाहीत आणि अनेक दिवसांचा अबोला नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो.
भांडणानंतर लगेच बोलल्यास समस्या वाढू शकते. राग शांत झाल्यावर आणि तुम्ही शांतपणे विचार करू शकण्याच्या स्थितीत असाल तेव्हाच संवाद साधा.
मेसेजमध्ये भावना योग्यरित्या व्यक्त होत नाहीत. त्यामुळे फोनवर किंवा समोरासमोर बोलणे जास्त फायदेशीर ठरते.
मीच का पुढाकार घेऊ? ही मानसिकता सोडा. जर तुम्हाला खरंच नातं वाचवायचं असेल, तर पहिले पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे.
जर तुमची चूक झाली असेल तर ती स्वीकारायला शिका. 'सॉरी' म्हणणे ही मोठी गोष्ट नाही, पण त्याचा नात्यावर सकारात्मक परिणाम होतो.