Akshata Chhatre
तुमच्या नात्यातील ती पूर्वीची चमक कुठेतरी हरवली आहे, असं तुम्हालाही वाटतं का? ती मजा-मस्ती, त्या गंभीर चर्चा आणि ती गोड भावना आता हळूहळू दूर होत आहेत?
प्रत्येक नात्यात एक असा टप्पा येतो जेव्हा प्रेमाची ज्योत मंद होऊ लागते, पण अनेकदा आपण या लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला वाटते की हे सामान्य आहे.
जर तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेकांशी कमी बोलत असाल, किंवा तुमच्या गप्पा फक्त 'कसा आहेस?' आणि 'जेवलास का?' एवढ्यापुरत्याच मर्यादित राहिल्या असतील, तर हा एक मोठा संकेत आहे.
प्रेमाच्या नात्यात छोटी-मोठी भांडणं होतच राहतात, पण जर ही भांडणे रोजची गोष्ट बनली असतील आणि प्रत्येक लहान गोष्टीवरून वाद होत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे.
जर तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा मित्रांमध्ये किंवा कामात जास्त व्यस्त राहू लागला असेल आणि तुमच्यासोबत वेळ घालवणे टाळत असेल, तर याचा अर्थ त्याच्या प्राधान्यक्रमात बदल झाला आहे.
जर आता तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या तब्येतीची, आवडीनिवडीची पर्वा वाटत नसेल, तर हे स्पष्ट आहे की प्रेम फिके पडत आहे.
तुम्ही दोघांनी भविष्याबद्दल बोलणे पूर्णपणे बंद केले असेल, तर याचा अर्थ तुम्ही दोघे आता तुमचे भविष्य एकत्र बघत नाही आहात.