गोमंतक ऑनलाईन टीम
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अमिताभ बच्चन हे कपल बॉलीवूडमधील एक आदर्श कपल समजले जाते.
तथापि, ऐश्वर्याचे तिची सासू अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी तसेच नणंद श्वेता बच्चन-नंदा हिच्याशीही पटत नसल्याची चर्चा होत असते.
नुकतेच पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्यासह श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा देखील सहभागी झाली होती.
पॅरिस फॅशन वीकमधील नव्याचा व्हिडिओ श्वेताने शेअर केला, पण त्यात ऐश्वर्याला टॅग केले नाही. तो व्हिडिओ ऐश्वर्यानेही शेअर केला नाही, ही देखील चर्चेची बाब ठरली होती.
करन जोहरच्या कॉफी विथ करनच्या एका भागात श्वेता ही अभिषेक बच्चनसोबत सहभागी झाली होती. तेव्हा तिने ऐश्वर्याचे कौतूक केले होते.
तथापि, श्वेताला ऐश्वर्याची एक गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे ऐश्वर्याचे टाईम मॅनेजमेंट.
कारण फोन कॉल्स, मेसेजेसला ऐश्वर्या वेळेत रिप्लाय करत नाही, असे श्वेता बच्चन-नंदा म्हणाल्या होत्या.