Akshata Chhatre
घोस्टिंगचा अनुभव खूप वेदनादायक आणि गोंधळात टाकणारा असतो. अचानक झालेले कम्युनिकेशन बंद होणे, यामुळे आपण स्वतःला दोष देऊ लागतो.
लक्षात ठेवा, घोस्टिंग हे समोरच्या व्यक्तीच्या अपरिपक्वता आणि कम्युनिकेशन टाळण्याच्या वृत्तीमुळे घडते.
त्या व्यक्तीने प्रतिसाद का दिला नाही, याबद्दल हजारो कथा तुमच्या मनात तयार करणे थांबवा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार नाहीत, हे सत्य स्वीकारा.
तुम्हाला वाईट वाटणे, राग येणे किंवा दुःख होणे स्वाभाविक आहे. या भावना दाबून न ठेवता त्यांना व्यक्त करा. रडा, लिहा किंवा विश्वासू मित्रांशी बोला.
घोस्टिंगनंतर 'क्लोजर' मिळणे खूप महत्त्वाचे असते, पण घोस्टर ते देणार नाही. त्यामुळे स्वतःला सांगा की, 'माझ्यासाठी हे नाते इथेच संपले'.
घोस्टरला मेसेज करणे, कॉल करणे किंवा त्यांना फॉलो करण्याची तीव्र इच्छा होईल. पण हे पूर्णपणे टाळा. त्यांच्या सोशल मीडियापासून दूर राहा.
जर त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल किंवा मेसेजेस पाहण्याची तुम्हाला सतत ओढ वाटत असेल, तर त्यांना तात्पुरते ब्लॉक करा. हे तुमचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी आवश्यक आहे.