Akshay Nirmale
म्हादई नदी जिथे समुद्राला येऊन मिळते तिथे नदीच्या किनाऱ्यावर हा किल्ला आहे.
1493 मध्ये विजापूरच्या आदिल शाहची येथे सशस्त्र चौकी होती. 1541 मध्ये पोर्तुगीजांनी बार्देशवर वर्चस्व मिळवले.
बार्देशवर वर्चस्वानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला तसेच येथे चर्चही बांधले. हे बार्देश तालुक्यातील पहिले चर्च मानले जाते.
1550 ते 1551 या काळात या किल्ल्याचे सुरवातीचे बांधकाम करण्यात आले. हा किल्ला 1550 मध्ये फ्रान्सिस्कन्सने बांधल्याचे सांगितले जाते.
नंतर अनेकदा त्याचा विस्तार केला गेला. 1707 मध्ये हा किल्ला पुन्हा उभारण्यात आला. या किल्ल्यावर तोफा, शस्त्रे आहेत.
या किल्ल्यामध्ये पूर्वी व्हाईसरॉय राहत असे. तसेच पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथून आलेले पाहुणे, मान्यवर राहत होते.
या किल्ल्यावरून म्हादई नदीवरील अटल सेतू ते मिरामारपर्यंतचा भाग दिसतो. 2008 मध्ये या किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्यात आला. हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.