गोमन्तक डिजिटल टीम
स्ट्रेस मॅनेजमेंट करावयाचे असेल तर ध्यान हा उत्तम उपाय आहे. ध्यान-धारणेमुळे आपल्या मनातील ताण-तणाव दूर होऊन मन प्रसन्न, चिंतामुक्त आणि काळजीमुक्त होते.
ध्यान-धारणेसाठी शांत परिसर निवडावा, जेणेकरून कोणताही अडथळा न येता पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
ध्यान सुरु करण्याआधी एक दीर्घ श्वास घ्या. ध्यान करतेवेळी तुमच्या श्वासावर तुमचे नियंत्रण असणे गरजेचे असते.
मनाला स्थिर करणे शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे ध्यान करत असताना कोणताही विचार मनात आणू नका.
ध्यान-धारणेमुळे आपले मन सशक्त होते, त्यामुळे आपल्यापुढे कोणतेही संकट किंवा समस्या निर्माण झाली, तरी आपण प्रसन्न राहू शकतो.
ध्यान-धारणेच्या सरावामुळे चालू वर्तमानकाळातील आपली बलस्थाने, स्थिती, कौशल्ये आणि आपल्या गुणांची आपल्याला जाणीव होते.