Akshata Chhatre
आजच्या काळात लाल लिपस्टिक ही केवळ सौंदर्याचं नाही, तर आत्मविश्वासाचं, धाडसाचं आणि स्वतंत्रतेचंही प्रतीक मानली जाते.
बॉसी-लूक हवा असो किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी सजायचं असो, प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये लाल लिपस्टिक नक्कीच असते.
आज जी आपण सहज, मोकळेपणाने वापरतो, त्या लाल लिपस्टिकचा इतिहास मात्र आश्चर्यकारक आणि काहीसा गडद आहे.
पूर्वीच्या काळात लाल लिपस्टिक फक्त एक रंगीत सौंदर्यवस्तू नव्हती, तर स्त्रियांच्या लढ्याचं प्रतीक होती. लोकांना वाटायचं की लाल लिपस्टिक लावणाऱ्या महिला चुडैल आहेत.
काही पुरुष तर असा आरोप करायचे की स्त्रियांनी लाल लिपस्टिक लावून त्यांना “मोहात पाडलं” आणि लग्नासाठी भाग पाडलं.
पुरावा नसतानाही समाज आणि कायदा स्त्रियांनाच दोषी मानत असे. त्यामुळे अनेक स्त्रियांना लाल लिपस्टिकचं नाव घ्यायलाही भीती वाटत असे.
मुळात सौंदर्य ही त्या काळच्या स्त्रियांसाठी समाजात स्वीकारलं जाण्याची एकमात्र गुरुकिल्ली होती. म्हणूनच त्यांनी हे सगळं सहन केलं.