दैनिक गोमन्तक
एक मध्यम आकाराचे बाऊल पोहे, एक टेबलस्पून आले- हिरवी मिरची- लसूण पेस्ट
अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, थोडी चिरलेली ताजी कोथिंबीर, एक उकडलेला बटाटा, चार चमचे तीळ, चवीनुसार मीठ व तळण्यासाठी तेल.
पोहे पाण्याने धुऊन घ्यावेत पण पाण्यात भिजवत ठेवू नका
एका मोठ्या बाऊलमध्ये हे भिजवलेले पोहे घेऊन त्यात मावेल इतपत टोमॅटो प्युरी घालावी व ते मिक्स करून घ्यावे. टोमॅटोचा रस पोह्यांमध्ये मुरला पाहिजे.
नंतर यात हिरवी मिरची- आले- लसूण- पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, उकडून कुस्करलेला बटाटा व अर्धे तीळ घालून हे व्यवस्थित मळून घ्यावे.
तुम्हाला आवडत असल्यास यात तुम्ही रंगासाठी थोडी काश्मिरी लाल मिरची पावडरही घालू शकता. या मिश्रणाचे वडे आवडत्या आकारात थापून घ्यावेत.
वरून थोडे उरलेले तीळ लावून हाताने हलक्या हाताने ते दाबावेत व अगदी गरम तेलात हे वडे कुरकुरीत तळून घ्यावेत. सर्व्ह करताना तुम्ही यावर चाट मसाला भुरभुरू शकता.