दैनिक गोमन्तक
आंबट चवीमुळेच जेवण रुचकर करणारी भाजी म्हणून या भाजीला आंबुशी
जर कफचे प्रमाण वाढले असेल तर या भाजीचा उपयोग केला जातो.
पावसाळ्यात सहज मिळणारी ही भाजी करण्यासाठी अगदी सोपी आहे.
आंबुशीची पाने, कांदा, लसूण, गूळ, शेंगदाणा कूट, तिखट किंवा ओली मिरची, मीठ इ.
कृती -
पाने स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत.
तेलात कांदा परतून त्यामध्ये लसूण, ओली मिरची चिरून घालणे किंवा तिखट घालणे.
थोडा गूळ, शेंगदाणा कूट घालून भाजी परतणे, आवश्यकतेप्रमाणे मीठ घालून भाजीला वाफ देणे.