Pranali Kodre
विराट कोहली हा सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो.
तो भारताव्यतिरिक्त फ्रँचायझी क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळतो.
महत्त्वाचे म्हणजे विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून गेली 16 वर्षे खेळत आहे.
त्याला 2008 च्या आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने जवळपास 12 लाख रुपयांना खरेदी केले होते.
तेव्हापासून विराट आयपीएलमध्ये केवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडूनच खेळत आहे.
त्यामुळे आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या सर्व 16 हंगामात एकाच संघाकडून खेळणारा विराट एकमेव खेळाडू आहे.
विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी आत्तापर्यंत 239 सामन्यातील 230 डावात 36.75 च्या सरासरीने 7130 धावा केल्या आहेत.
यातील 216 सामने त्याने आयपीएलमध्ये खेळले असून 6411 धावा केल्या आहेत.