Kavya Powar
रेझरने शेव्ह केल्याने केस जाड होतात, असे तुम्हीही अनेकदा ऐकले असेल.
पण खरच रेझरमुळे केस जाड होतात का?
शेव्हिंग केल्याने केस जाड होतात हा केवळ एक भ्रम आहे.
कारण जेव्हा केस रेझरने शेव्ह केले जातात तेव्हा त्याचा मधला भाग किंवा मुळाच्या अगदी जवळचा भाग कापला जातो.
अशा परिस्थितीत जेव्हा केस वाढतात तेव्हा ते जाड दिसू लागतात
या जाड भागामुळे केस दाट आणि जाड असल्याचा भास होतो