रवीना टंडन जेव्हा ब्रेक - अपच्या वेदना सहन करत होती

Rahul sadolikar

रवीना आणि अक्षयचं नातं

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे प्रेमप्रकरण प्रसिद्ध आहे. दोघांनी 'मैं खिलाडी तू अनारी' आणि 'मोहरा' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

Raveena Tandon | Dainik Gomantak

अक्षय-रवीनाची एंगेजमेंट

एकत्र काम केल्यानंतर दोघांची प्रेमकथा सुरू झाली. 1995 मध्ये त्यांची एंगेजमेंटही झाली होती. 

Raveena Tandon | Dainik Gomantak

रवीना झाली भावूक

आता रवीनाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या एंगेजमेंटबद्दल बोलताना भावूक झाली आहे.

Raveena Tandon | Dainik Gomantak

नातं तुटलं अन् रवीनाही

काही वर्षे अक्षय-रवीना एकत्र राहिले पण हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले

Raveena Tandon | Dainik Gomantak

रवीना पूर्णत: तुटली होती

रवीना सांगते ''माझी एंगेजमेंट तुटली तेव्हा माझ्याकडे काम नव्हते. पुढे काय करावं ते समजत नव्हतं.

Raveena Tandon | Dainik Gomantak

झोप उडाली होती

जेव्हा मला झोप येत नसे, तेव्हा मी माझी कार घेऊन, संगीत चालू करायचे आणि गाडी चालवायला जायचे. 

Raveena Tandon | Dainik Gomantak

झोपड्यांमधले ते दृश्य

"एका रात्री माझी नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांवर गेली. आणि प्रत्येक झोपडीचे दृश्य अक्षरशः देवाने माझे डोळे उघडण्यासाठी ठेवले होते असं मला वाटलं.. यालाच जीवन म्हणतात"

Raveena Tandon | Dainik Gomantak

नवरा बायकोला मारत होता

त्या झोपडीत एक व्यक्ती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत होता. बाहेर उघड्या पावसात मुल जोरात रडत होतं. मी म्हणाले माझं आयुष्य याहुन चांगलं आहे मला काय कमी आहे?

Raveena Tandon | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak