Sameer Panditrao
भाटले येथील श्री राम मंदिरात सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री रामाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री रामनवमी उत्सवानिमीत्त श्री महालसा संस्थान म्हार्दोळ येथे श्री राम अलंकारातील श्री महालसा नारायणी देवीची मूर्ती.
वाळपई श्री हनुमान देवस्थानात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
‘सियावर प्रभू रामचंद्र की जय’ आदी जयघोष आणि श्रीराम जन्मसोहळा गिमोणे-पिळगाव येथील श्री रामचंद्र उर्फ रघुनाथ देवस्थानात रामनवमी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
कोरगाव येथी श्री कमळेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.दुपारी ठिक १२ वाजता वाद्यांच्या गजरात पाळणा गीताने रामजन्म सोहळ्याला सुरुवात झाली.
मडगाव शहरात वेगवेगळ्या मंदिरांमध्ये रामनवमी उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळपासून या सर्व मंदिरांमध्ये भक्तभाविकांची उपस्थिती मोठ्या संखेने दिसत होती.
श्री रामनवमीनिमित्त पंटेमळ येथील श्री राम मंदिरात सपत्निक श्रींचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जनतेच्या कल्याणाची प्रार्थना केली.