Manish Jadhav
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर त्याच्या विस्फोटक ओळखला जातो. तो अनेकदा सोशल मीडियावर आपल्या बहिणीसोबतचे फोटो, व्हिडिओ, रिल्स शेअर करत असतो. त्याच्या बहिणीचे नाव श्रेष्ठा अय्यर आहे.
श्रेष्ठा अय्यर अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ आणि रील पोस्ट करते जे चाहत्यांना खूप आवडतात. श्रेष्ठा मूळची केरळची असून सध्या ती मुंबईत राहत आहे.
श्रेयस अय्यरची धाकटी बहीण श्रेष्ठा अय्यर ही प्रोफेशनल डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
देशभरात रक्षाबंधनाच्या सणाची तयारी सुरु झाली आहे. भाऊ-बहिणीचा हा सण बुधवारी आणि गुरुवारी संपूर्ण भारतभर साजरा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या बहिणीबद्दल सांगणार आहोत.
श्रेष्ठा अय्यर इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 82 हजार फॉलोअर्स आहेत.
श्रेष्ठाचे डान्स व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप फेमस आहेत. ती अनेकदा आपल्या भावाबरोबर डान्स करताना दिसून आली आहे.
श्रेष्ठा, वडील संतोष अय्यर, भाऊ श्रेयस आणि आई रोहिणी अय्यर यांची हॅप्पी फॅमिली आहे.
श्रेष्ठा अय्यर तिच्या भावासारखीच विनोदी स्वभावाची आहे. ती आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.