Pranali Kodre
भारतीय क्रिकेटच्या इतिहात 20 जून ही तारीख खूप खास आहे. कारण याच दिवशी भारताकडून तीन खेळाडूंचे कसोटी पदार्पण झाले, जे आता दिग्गज म्हणून ओळखले जातात.
हे तीन खेळाडू म्हणजे राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विराट कोहली.
राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी लॉर्ड्सवर 20 जून 1996 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
पदार्पणाच्या सामन्यातच गांगुलीने 131 धावांची शतकी खेळी, तसेच 3 विकेट्स घेतल्या होत्या.
राहुल द्रविडने पहिल्या कसोटीत 95 धावांची खेळी केली होती.
त्यानंतर 15 वर्षांनी विराटने 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध किंगस्टोन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते.
विराटने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 4 आणि 15 धावांची खेळी केली होती.
विशेष गोष्ट अशी की द्रविड, गांगुली आणि विराट या तिघांनीही नंतर पुढे जाऊन 100 पेक्षा अधिक कसोटी सामनेही खेळले.
इतकेच नाही, तर द्रविड, गांगुली आणि विराट यांनी भारतीय संघाचे नेतृत्वही केले.