Pranali Kodre
वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली. पहिलाच सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 9 विकेट्सने विजय मिळवला.
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्याच न्यूझीलंडचा 23 वर्षीय क्रिकेटपटू रचिन रविंद्रने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 96 चेंडूत नाबाद 123 धावांची शतकी खेळी करताना मोठा विक्रमही रचला.
रचिन पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप खेळत असून तो वनडे वर्ल्डकपच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा न्यूझीलंडचा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.
रचिनने 5 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध जेव्हा पहिले शतक ठोकले, तेव्हा त्याचे वय 23 वर्षे 321 दिवस इतके होते.
त्यामुळे त्याने न्यूझीलंडच्या नॅथन एस्टलचा विक्रम मोडला. एस्टलने 1996 साली पहिला वर्ल्डकप सामना खेळताना 24 वर्षे 152 दिवस वय असताना इंग्लंडविरुद्ध अहमदाबादलाच शतक ठोकले होते.
दरम्यान, वनडे वर्ल्डकपमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी वयात शतक ठोकणारा रचिन जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम विराटच्या नावावर असून त्याने 2011 मध्ये बांगलादेशविरुद्ध 22 वर्षे 106 दिवस वय असताना शतक केले होते.
या यादीत झिम्बाब्वेचे अँडी फ्लॉवर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 1992 साली वर्ल्डकप खेळताना श्रीलंकेविरुद्ध प्लायमाऊथला 23 वर्षे 301 दिवस वय असताना शतक केले होते.
दरम्यान, रचिनच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने शतकी खेळी करण्याबरोबरच डेवॉन कॉनवेबरोबर (152) दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांनी नाबाद भागीदारीही केली.तसेच त्याने गोलंदाजी करताना हॅरी ब्रुकची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली.
रचिनला वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सामन्यात त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.