Pranali Kodre
तमिळनाडू प्रीमियर लीग 2023 हंगामासाठी नुकतेच खेळाडूंचा लिलाव पार पडला.
या लिलावात भारताचा फिरकीपटू आर अश्विन देखील सहभागी झाला होता.
या लिलावात अश्विन डिंडिगुल ड्रॅगन संघाच्या टेबलवर बसलेला दिसला होता.
त्याने या लिलावात सक्रिय सहभाग घेताना बोलीही लावल्या.
महत्त्वाचे म्हणजे सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असेलल्या कसोटी मालिकेसाठी अश्विन भारतीय संघाचा भागही आहे.
पण दुसरा सामना लवकर संपल्याने खेळाडूंना इंदोरला होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी १० दिवसांची विश्रांती मिळाली.
याचदरम्यान अश्विनने टीनपीएलच्या सातव्या हंगामाच्या लिलावात सहभाग घेतला.
त्याचे या लिलावातील अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की डिंडिगुल ड्रॅगनने कायम केलेल्या ११ खेळाडूंमध्ये अश्विनचाही समावेश आहे.
या लिलावाच डिंडिगुल ड्रॅगन फ्रँचायझीसाठी वरुण चक्रवर्ती, बाबा इंद्रजित हे सर्वात महागडे खेळाडू ठरले.