Akshata Chhatre
सुंदर आणि फ्रेश दिसण्याची इच्छा कोणाला नसते? यासाठी अनेकदा लोक महागडी ब्युटी उत्पादने वापरतात आणि मोठी रुटीन फॉलो करतात.
तुम्हाला फक्त काही सोप्या गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे तुमची त्वचा नेहमी निरोगी आणि चमकदार राहते.
निरोगी त्वचा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा दिवसभर हायड्रेटेड आणि टवटवीत राहील.
चेहऱ्यावरील घाण आणि तेल काढणे खूप आवश्यक आहे, पण वारंवार किंवा खूप स्ट्रॉंग क्लींजर वापरल्याने त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो. म्हणून, सल्फेट-फ्री आणि पीएच-बॅलन्स्ड क्लींजर वापरा आणि दिवसातून फक्त दोन वेळाच चेहरा धुवा.
कमीत कमी SPF 30 असलेली सनस्क्रीन रोज सकाळी लावा. हलकी आणि नॉन-ऑयली सनस्क्रीन निवडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून चेहरा दिवसभर फ्रेश दिसेल.
बऱ्याच लोकांना वाटते की तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते, पण हे चुकीचे आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल, तर तुम्ही हलके, जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.
चमकदार त्वचेसाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. रात्री झोपताना त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. जर तुमची झोप पूर्ण झाली नाही किंवा तुम्हाला जास्त ताण असेल, तर त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसेल.