Home Cleaning Hacks: झटपट घर आवरायचंय? कमी वेळेत घर सुंदर दिसण्यासाठी करा 'या' गोष्टी

गोमंतक ऑनलाईन टीम

पसारा आधी आवरा!

घरातील विखुरलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवा. यामुळे घर लगेच स्वच्छ आणि नीटनेटके दिसेल.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

सोफा आणि कुशन सजवा!

सोफ्यावरील कुशन व्यवस्थित लावा आणि कव्हर्स बदला. लिव्हिंग रूमला नवा लुक मिळेल.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

फरशी आणि कार्पेट स्वच्छ करा!

झाडू किंवा व्हॅक्यूम क्लिनरने धूळ काढा. प्रवेशद्वार आणि लिव्हिंग रूमवर विशेष लक्ष द्या.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

किचनचा ओटा मोकळा ठेवा!

अनावश्यक वस्तू बाजूला करा आणि ओटा स्वच्छ पुसून घ्या. स्वच्छ किचनमुळे घर अधिक आकर्षक दिसते.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

पडदे आणि बेडशीट बदला!

स्वच्छ पडदे आणि नीटनेटकी बेडशीट घराला फ्रेश लुक देतात.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

घरात सुगंध दरवळू द्या!

खिडक्या उघडून ताजी हवा येऊ द्या. आवडता रूम फ्रेशनर किंवा सुगंधी फुले वापरा.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

छोट्या सजावटीने वाढवा घराची शोभा!

टेबलवर फुलदाणी, छोटा दिवा किंवा सुंदर रोप ठेवा. कमी खर्चात घराला आकर्षक लुक मिळेल.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

स्किनकेअर करताना नकळत करताय 'या' चुका? त्वचेला नुकसान होण्यापूर्वी सावध व्हा!

येथे क्लिक करा