Akshata Chhatre
समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून प्रेम आणि आकर्षण या संकल्पनांचा वेध घेत आहेत.
स्त्रियांना कोणते पुरुष आवडतात हा प्रश्न केवळ बाह्य रूपावर अवलंबून नसतो, तर त्यामागे अनेक मानसिक आणि सामाजिक घटक लपलेले असतात.
काही संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की स्त्रियांना प्रामाणिक संवाद साधणारे, त्यांच्या भावनांचा आदर करणारे आणि संयमी पुरुष जास्त आकर्षित करतात.
व्यक्तिमत्त्वाची उब, साधेपणा, चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि समजून घेण्याची वृत्ती हेच स्त्रियांच्या मनाचा ठाव घेतात.
तसेच वयाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. अनेक महिला वयस्कर पुरुषांना पसंती देतात कारण त्यांच्यात अनुभव, स्थैर्य आणि आत्मविश्वास जाणवतो.
हलक्या दाढीचा लूक हा सध्याच्या काळातील आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
यावरून असं म्हणता येईल की आकर्षण ही एक केवळ शारीरिक बाब नसून व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, भावनिक परिपक्वता आणि वर्तन यांचा संगम आहे.