Sameer Amunekar
प्रोटीन कमी झाल्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे दिवसभर आळस, थकवा आणि कमजोरी जाणवते.
शरीर प्रोटीनअभावात असताना ऊर्जा मिळवण्यासाठी स्नायूंचे ऊतक तोडू लागते, ज्यामुळे स्नायू कमी होतात आणि शरीर कमकुवत होते.
प्रोटीनची कमतरता असल्यास केस गळणे, नखे तुटणे आणि त्वचा कोरडी होणे अशा समस्या दिसून येतात.
प्रोटीन ऊतक दुरुस्तीसाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याची कमतरता असल्यास जखमा किंवा कापलेले भाग लवकर बरे होत नाहीत.
प्रोटीनमधून तयार होणारे अमिनो अॅसिड मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर संतुलित ठेवतात. त्यांची कमतरता झाल्यास मन अस्थिर राहते आणि चिडचिड वाढते.
प्रोटीन हे हाडांच्या मजबुतीसाठीही आवश्यक आहे. कमी प्रोटीनमुळे हाडांची झीज आणि सांध्यांमध्ये दुखणे वाढते.
शरीरातील पोषणतत्वांचे संतुलन बिघडल्याने भूक कमी होते किंवा वारंवार खाण्याची इच्छा होते.