गोमन्तक डिजिटल टीम
१ एप्रिल २०२३ ला व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता
१९७३ ला वाघांच्या संवर्धनासाठी व्याघ्रप्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती.
आता व्याघ्रप्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय अर्थमंत्रालयाने ५० रुपयांचे टायगर कॉइन निर्माण करण्याची घोषणा केली आहे
हा टायगर कॉईन पंचधातूंचा बनलेला असेल
पहिला व्याघ्रप्रकल्प उत्तराखंडच्या जिम कोर्बेट नॅशनल पार्कमध्ये करण्यात आला होता
आता सध्या देशात ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत.
सध्या वाघांची संख्या सुमारे २५०० इतकी आहे..
दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते.
जगभरातील व्याघ्रसंख्येच्या ७० टक्के वाघ भारतात आहेत.