Karan Johar आहे 1640 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक

गोमन्तक डिजिटल टीम

करनचा जन्म 25 मे 1972 रोजी झाला आहे. करन हा केवळ निर्माता आणि दिग्दर्शक नसून त्याला डिझायनिंग, पटकथालेखक, टेलीव्हीजन होस्ट, रिअॅलिटी शोचा जज अशाही भुमिका तो पार पाडतो.

Karan Johar | Dainik Gomantak

बॉलीवुडमध्ये येणाऱ्या अनेक स्टार किड्सचा मेंटॉर म्हणूनही करन ओळखला जातो.

Karan Johar | Dainik Gomantak

करन चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी 3 कोटी रूपये मेहनताना घेतो. करन जोहरची महिन्याची कमाई 10 कोटी रूपये आहे तर वर्षाची कमाई 100 कोटी रूपये आहे.

Karan Johar | Dainik Gomantak

करनकडे सीफेसिंग फ्लॅट असून कार्टर रोडवर एक ड्युप्लेक्स मॅन्शन आहे. याशिवाय मलबार हिल परिसरात त्याचा 20 कोटींचा एक बंगलाही आहे.

Karan Johar | Dainik Gomantak

करन जोहरकडे 8 कोटींच्या कार्स आहेत. त्यात बीएमडब्ल्यू 745, बीएमडब्ल्यू 760, मर्सडीस एस क्लास या गाड्यांचा समावेश आहे.

Karan Johar | Dainik Gomantak

करन जोहर हा सरोगसीद्वारे दोन मुलांचा बाप झाला आहे. त्याच्या मुलाचे नाव यश आहे. जे त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तर मुलीचे नाव रूही आहे. जे करनच्या आईच्या हिरू या नावाच्या उलट होते.

Karan Johar | Dainik Gomantak

करनला पुर्वी इंग्रजी K या आद्याक्षराचे आकर्षण होते. त्यामुळे त्याच्या चित्रपटांची नावे K वरून सुरू होत होती. नंतर त्याचे हे प्रेम कमी झाले.

Karan Johar | Dainik Gomantak
Dainik Gomantak