Ashutosh Masgaunde
एकेकाळी प्रिया पुनियाला मुलगी आहे म्हणून क्रिकेट अकादमीत प्रवेश नाकारण्यात आला होता.
प्रियाच्या वडिलांनी तिच्यासाठी सराव खेळपट्टी तयार करण्यासाठी त्यांचे घर विकले होते.
डिसेंबर 2018 मध्ये, पहिल्यांदा प्रियाची न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय T-20 संघात निवड झाली.
प्रियाने दिल्लीच्या जीझस अँड मेरी कॉलेजमधून कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
राहुल द्रविड प्रियाचा आदर्श खेळाडू आहे. तर विराट कोहली हा तिचा आवडता खेळाडू आहे.
क्रिकेटशिवाय प्रिया पुनियाला बॅडमिंटन खेळायला आवडते.
प्रिया पुनियाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते आणि ती मिताली राजसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंची उत्तराधिकारी ठरू शकते.