भारतीय क्रिकेटचा 'प्रिन्स'

Pranali Kodre

वाढदिवस

भारताचा क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलचा 8 सप्टेंबर रोजी 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Shubman Gill | Dainik Gomantak

प्रिन्स

शुभमन गिलला भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा वारसदार म्हणून समजले जाते. तसेच त्याला प्रिन्स म्हणूनही ओळखले जाते.

Shubman Gill | Dainik Gomantak

विक्रमी गिल

गिलने आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत.

द्विशतक

तो वनडेमध्ये द्विशतक करणारा सर्वात युवा क्रिकेटपटू आहे. त्याने जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक केले, तेव्हा त्याचे वय 23 वर्षे 132 दिवस होते.

शतकवीर

त्याने त्याच्या कारकिर्दीत कसोटी, वनडे, आंतरराष्ट्रीय टी20, आयपीएल या प्रकारांमध्येही शतक केले आहे.

विश्वविजेता

तो 2012 साली 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. विशेष म्हणजे तो 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा मालिकावीरही ठरला होता.

सामने

शुभमन गिलने त्याच्या कारकिर्दीत 18 कसोटी, 29 वनडे आणि 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

कसोटी कारकिर्द

त्याने कसोटीत 966 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतके केली.

वनडे आणि टी20 कारकिर्द

शुभमनने 29 वनडे सामने खेळले असून 1514 धावा केल्या आहेत. यात त्याने 4 शतके आणि 7 अर्धशतके केली आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकांसह 304 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी