Tomato Price In Goa: खुशखबर, गोव्यात टोमॅटोचा दर आला अर्ध्यावर!

Shreya Dewalkar

गोव्यात टोमॅटोचा दर 80 रुपये किलो, पुढील महिन्‍यापर्यंत स्‍थिती येणार पूर्वपदावर; डिचोलीत आवक वाढली

Tomato | Dainik Gomantak

गेल्या चार-पाच महिन्यांपासून स्वयंपाक घरातून गायब झालेल्‍या आणि आहारातील एक प्रमुख घटक असलेल्या टोमॅटोचे दर आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येण्याचे संकेत मिळाले आहेत.

Tomato | Dainik Gomantak

शुक्रवारी 160 रुपयांपर्यंत असलेला टोमॅटोचा दर शनिवारी एकदम अर्ध्या पटीने म्‍हणजे 80 रुपयांवर आला.

Tomato Price | Dainik Gomantak

डिचोलीत प्रतिकिलो 80 रुपयांनी शनिवारी टोमॅटोची विक्री करण्‍यात येत होती. आवक वाढल्याने टोमॅटोचा दर उतरला असून,

Tomato Price | Dainik Gomantak

श्रावण महिन्यात तो पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. तसे संकेत विक्रेत्यांकडून मिळाले आहेत.

Tomato Price | Dainik Gomantak

गेल्या चार-पाच महिन्यांपासून टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते. शुक्रवारपर्यंत प्रतिकिलो 160 रुपयांपर्यंत दर गेला होता.

Tomato Price | Dainik Gomantak

त्यामुळे सामान्य लोकांच्‍या स्‍वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाला होता. दर ऐकताच नको तो टोमॅटो म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली होती.

Tomato Price | Dainik Gomantak

स्वयंपाकघर सोडाच, हॉटेलमध्‍येही टोमॅटोचे दर्शन दुर्लभ झाले होते. मात्र आता टोमॅटो स्वस्त होण्याचे संकेत मिळाल्याने सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

Tomato Price | Dainik Gomantak

कर्नाटकातून गोव्‍यात येणाऱ्या अन्य भाज्याही स्वस्त होण्याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

Tomato Price | Dainik Gomantak

डिचोलीच्या बाजारपेठेत कर्नाटक राज्यातून टोमॅटो येत असतो. मात्र हवामानातील बदलाचा परिणाम टोमॅटोच्‍या पिकावर झाला.

Tomato Price | Dainik Gomantak

त्यातच कर्नाटकातून दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यांत टोमॅटोची निर्यात होत होती. त्यामुळे गोव्‍यात टोमॅटोची टंचाई निर्माण झाली होती.

Tomato Price | Dainik Gomantak

या राज्यांतील निर्यात आता बंद झाल्याने गोव्यात टोमॅटोची आवक वाढणार आहे. हळूहळू टोमॅटोचे दर पूर्वपदावर येतील.

Tomato | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा...