Pramod Yadav
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोंडा येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई आणि मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांना शांतादुर्गा मंदिराची फोटोफ्रेम भेट देण्यात आली.
दिवसाच्या सुरूवातीला त्यांनी ओल्ड गोव्यातील प्रसिद्ध बॅसिलिका ऑफ बॉम जिझस चर्चला भेट दिली.
यावेळी त्यांना प्रभू येशूची मूर्ती भेट देण्यात आली.
राष्ट्रपतींसोबत यावेळी मुख्यमंत्री त्यांच्य पत्नी, राज्यपाल, ख्रिस्ती धर्मगुरू उपस्थित होते.
तत्पूर्वी त्यांनी राजभवन येथे राज्यपालांच्या पत्नी श्रीमती रिटा पिल्लई यांच्या हस्ते साडी भेट देण्यात आली.