Pramod Yadav
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गोवा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गोवा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
मुर्मू यांनी गोवा विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजभवन, दोना पावला येथे झाडाचे रोपटे लावले. आणि त्यास पाणी घातले.
त्यानंतर, सायंकाळी चार वाजता त्या गोवा विधानसभेत आमदारांना संबोधित करण्यासाठी हजर राहिल्या.
राज्यपाल पिल्लई, सभापती तवडकर, मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत राज्यातील आमदार यावेळी विधानभवनात हजर होते.
राष्ट्रपती मुर्मू यांनी राज्यातील सर्व आमदारांचे अभिनंदन करत राज्य आणि देशाच्या विकासाठी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले.