Pramod Yadav
देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू गोवा दौऱ्यासाठी मंगळवारी राज्यात दाखल झाल्या.
दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्यांचे स्वागत केले.
भारतीय नौदलाच्या वतीने राष्ट्रपती मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली.
राष्ट्रपती मुर्मू यांनी मंगळवारी पणजी येथील आझाद मैदानाला भेट दिली.
त्यांनी हुतात्मा स्मरकावर पुष्पहार अर्पण करून गोव्याच्या हुतात्मा स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली.
राजभवनात राष्ट्रपतींच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना वन हक्क कायद्यांतर्गत सनद वाटप करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच गोव्यात आल्या आहेत. यानिमित्ताने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना गोव्याची विशेष कुणबी साडी आणि कुणबी शॉल देत लामण दिवा प्रधान केला.
बुधवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली.