Akshay Nirmale
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी तेजपूर हवाईतळावरून सुखोई-30 एमकेआय या फायटर जेटमधून उड्डाण केले.
उड्डाण करण्यापुर्वी फ्लाईंग सुट परिधान करून राष्ट्रपती मुर्मू यांना उपस्थितांना अभिवादन केले.
राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असतात, त्यामुळे त्यांना संरक्षणविषयक सर्व शस्त्रास्त्रे, धोरणांची माहिती दिली जाते.
सुखोई Su-30MKI चा कमाल वेग 2120 किलोमीटर प्रतीतास आहे.
यापुर्वी प्रतिभाताई पाटील, एपीजे अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद यांनीही फायटर जेटमधून उड्डाण केले आहे. पण त्यांनी पुण्यातून हे उड्डाण केले होते.
लँडिंगनंतर मुर्मू यांना हवाईदलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला.
राष्ट्रपतींनी पायलट आणि इतर जवानांसमवेत फायटर जेटसमोर फोटोही काढले.