दैनिक गोमन्तक
आंबा हा जवळजवळ सगळ्यांचेच आवडते फळ आहे.
आंब्यामुळे अनेकजण उन्हाळ्याची वाट पाहत असतात. आता त्यापासून एक चवदार पदार्थ बनवला जाऊ शकतो
भिजत ठेवलेला सुवासिक तांदूळ बासमती दोन चमचे, दूध एक लिटर, साखर चार ते सहा चमचे,आंब्याचा घट्ट रस एक वाटी.
व्हिपिंग क्रीम अर्धा ते पाऊण वाटी, चार चमचे आंब्याचा रस आणि थोड्या आंब्याच्या फोडी टॉपिंगसाठी ठेवाव्यात
भिजवलेला तांदूळ मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्या. दुधाला उकळी आल्यावर तांदळाची पेस्ट घालून सतत ढवळत राहावं. हे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यावर साखर घालून मिक्स करावं व थंड होऊ द्यावं.
नंतर यात आंब्याचा रस मिक्स करून ही फिरणी चाळणीनं गाळून घ्यावी.
व्हिपिंग क्रीम फेटून घ्यावं. ते चांगले फेटल्यानंतर त्यात थोडासा आंब्याचा रस घालावा. फिरणी व व्हिपिंग क्रीम वेगवेगळ्या पायपिंग बॅगमध्ये भरावेत.
सर्व्हिंग ग्लासमध्ये प्रथम फिरणी घालावी. त्यावर व्हिपिंग क्रीम डिझाईन काढावं. थोड्याशा आंब्याच्या फोडी व्हिपिंग क्रीमवरती ठेवून हे थंडगार सर्व्ह करावं.