Akshata Chhatre
आजकाल वयाच्या तिशीच्या आतच अनेकांना केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. अगदी किशोरवयीन मुलांमध्येही ही समस्या दिसून येते.
त्यामुळे केस रंगवणे, डाई करणे, हेअर ट्रीटमेंट करणे हे त्यांच्या सौंदर्य दिनचर्येचा भाग बनले आहे. मात्र, हे सर्व उपाय तात्पुरतेच लाभ देतात.
नैसर्गिक उपायांकडे वळणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा रस प्यावा. या रसांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C हे केसांना पोषण देऊन त्यांना नैसर्गिक रंग टिकवतात.
नियमित नख घासण्याचा व्यायाम केल्यास केसांच्या मुळांना चालना मिळते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि पांढरे होण्याची गती मंदावते.
आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे, जसे की पालक, मेथी, शेपू, यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि ते मजबूत राहतात.